मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन विशेष १७ सप्टेंबर

    आदरणीय गुरुजन व सुजाण श्रोतेहो नमस्कार .

आज १७ सप्टेंबर मराठवाड्याचा मुक्तिदिन . आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य झाला पण मराठवाडा मात्र पारतंत्र्यातच होता . निजामशहाच्या अत्याचाराने त्रासला होता . स्वतंत्र भारत देशामध्ये असे छोटे छोटे तुकडे असणे देशाच्या सावभौमत्वासाठी धोकादायक होते . तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी निजामशहाला सवतंत्र भारतामध्ये विलीन होण्याचे आवाहन केले . निजामशाहाने या आवाहनाला केराची टोपली दाखवली .

       मवाळ नेहरूंपुढे न झुकणाऱ्या निजामशाहासाठी तत्कालीन गृहमंत्री , लोहपुरुष सरदार वल्लभभाई पाटील यांनी पुढाकार घेतला . विनंती न करता पोलिस कारवाई केली . निजामशाहीमध्ये सैन्य घुसवलं व निजामशहास गुडघे टेकण्यास भाग पाडले . ही घटना घडली तो दिवस म्हणजे १७ सप्टेंबर १९४८ . म्हणूनच हा दिवस संपुर्ण मराठवाड्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो .

     या स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रखर लढा दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना विनम्र अभिवादन करतो व मी थांबतो .

जय हिंद , जय महाराष्ट्र , जय मराठवाडा .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लाचखोर लोकसेवका विरोधात मोबाईलच्या साहाय्याने बिनधास्तपणे सहज करा तक्रार