लाचखोर लोकसेवका विरोधात मोबाईलच्या साहाय्याने बिनधास्तपणे सहज करा तक्रार
आपण देशात भ्रष्टाचार वाढलाय म्हणून नेहमीच ओरडतो पण याविरुद्ध आवाज उठवायला मात्र घाबरतो . इतरांसाठी जाऊ द्या पण स्वतःलाही लाच द्यायची वेळ आली तर गपगुमानपणे लाच देऊन मोकळे होतो . यामागे काम न होण्याची किंवा कामास विलंब होण्याची भिती असते . यातूनच भ्रष्टाचाराचा बकासुर वाढीस लागतो .
यावर आळा घालायचा असेल तर केवळ पोकळ गप्पा मारण्यापेक्षा कृती करण्याची गरज आहे. ही कृती अत्यंत सोपी आहे . आपल्या हाती असलेल्या मोबाईलच्या साहाय्याने आपण सहजपणे लाच घेणाऱ्या लोकसेवका विरोधात तक्रार करू शकतो .
ही तक्रार कशी आणि कोठे करायची हेच आपण या लेखात समजून घेणार आहोत .
१) आपणास कोणत्याही शासकीय कामासाठी , शासकिय कर्मचारी / लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास आपण आपल्या मोबाईलवरून १०६४ या क्रमांकावरती कॉल करून तक्रार नोंदवू शकता .
२) आपण ९९३०९९७७०० या क्रमांकावरती व्हॉटसअप मेसेज करूनही भ्रष्टाचाराची तक्रार करू शकता .
३) आपण acbMaharashtra या वेबसाईटवर ऑनलाइन तक्रारही नोंदवू शकता .
याकरिता chrome ब्राउजरमध्ये acbMaharashtra हे शब्द टाइप केले कि आपणास acbMaharashtra ची वेबसाईट सुरुवातीलाच दिसेल
३) यामध्ये ' ऑनलाइन तक्रार' यावरती क्लिक केल्यावर आपणास सहजपणे लाच मागणाऱ्या लोकसेवकाची तक्रार करता येते .
भ्रष्टाचाऱ्याच्या तीन प्रकाराच्या तक्रारीची नोंद आपणास करता येते .
अ) लाचेची मागणी - शासकिय कामाकरिता लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास
ब) अपसंपदा - लोकसेवकाकडे उत्पन्नापेक्षा जास्त बेहिशोबी मालमत्ता असल्यास
क) पदाचा दुरुपयोग - पदाचा दुरुपयोग करून नियमबाह्य काम केल्यास
अपसंपदा व पदाचा दुरुपयोग या तक्रारीमध्ये , तक्रारदाराची ओळख गुप्त ठेवली जाते .
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ,भ्रष्टाचाराविरोधात तक्रार नोंदवण्याची अतिशय सोपी पद्धत आपणास उपलब्ध करून दिली आहे .
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून भ्रष्टाचार विरोधी मोहीम सशक्त करूया व देशाच्या प्रगतीस हातभार लावूया .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा