पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लाचखोर लोकसेवका विरोधात मोबाईलच्या साहाय्याने बिनधास्तपणे सहज करा तक्रार

 आपण देशात भ्रष्टाचार वाढलाय म्हणून नेहमीच ओरडतो पण याविरुद्ध आवाज उठवायला मात्र घाबरतो . इतरांसाठी जाऊ द्या पण स्वतःलाही लाच द्यायची वेळ आली तर गपगुमानपणे लाच देऊन मोकळे होतो . यामागे काम न होण्याची किंवा कामास विलंब होण्याची भिती असते . यातूनच भ्रष्टाचाराचा बकासुर वाढीस लागतो . यावर आळा घालायचा असेल तर केवळ पोकळ गप्पा मारण्यापेक्षा कृती करण्याची गरज आहे. ही कृती अत्यंत सोपी आहे . आपल्या हाती असलेल्या मोबाईलच्या साहाय्याने आपण सहजपणे लाच घेणाऱ्या लोकसेवका विरोधात तक्रार करू शकतो .  ही तक्रार कशी आणि कोठे करायची हेच आपण या लेखात समजून घेणार आहोत . १) आपणास कोणत्याही शासकीय कामासाठी , शासकिय कर्मचारी / लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास आपण आपल्या मोबाईलवरून १०६४ या क्रमांकावरती कॉल करून तक्रार नोंदवू शकता . २) आपण ९९३०९९७७०० या क्रमांकावरती व्हॉटसअप मेसेज करूनही भ्रष्टाचाराची तक्रार करू शकता . ३) आपण acbMaharashtra  या वेबसाईटवर ऑनलाइन तक्रारही नोंदवू शकता . याकरिता chrome ब्राउजरमध्ये acbMaharashtra हे शब्द टाइप केले कि आपणास acbMaharashtra ची वेबसाईट सुरुवातीलाच दिसेल ३) य...