पोस्ट्स

लाचखोर लोकसेवका विरोधात मोबाईलच्या साहाय्याने बिनधास्तपणे सहज करा तक्रार

 आपण देशात भ्रष्टाचार वाढलाय म्हणून नेहमीच ओरडतो पण याविरुद्ध आवाज उठवायला मात्र घाबरतो . इतरांसाठी जाऊ द्या पण स्वतःलाही लाच द्यायची वेळ आली तर गपगुमानपणे लाच देऊन मोकळे होतो . यामागे काम न होण्याची किंवा कामास विलंब होण्याची भिती असते . यातूनच भ्रष्टाचाराचा बकासुर वाढीस लागतो . यावर आळा घालायचा असेल तर केवळ पोकळ गप्पा मारण्यापेक्षा कृती करण्याची गरज आहे. ही कृती अत्यंत सोपी आहे . आपल्या हाती असलेल्या मोबाईलच्या साहाय्याने आपण सहजपणे लाच घेणाऱ्या लोकसेवका विरोधात तक्रार करू शकतो .  ही तक्रार कशी आणि कोठे करायची हेच आपण या लेखात समजून घेणार आहोत . १) आपणास कोणत्याही शासकीय कामासाठी , शासकिय कर्मचारी / लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास आपण आपल्या मोबाईलवरून १०६४ या क्रमांकावरती कॉल करून तक्रार नोंदवू शकता . २) आपण ९९३०९९७७०० या क्रमांकावरती व्हॉटसअप मेसेज करूनही भ्रष्टाचाराची तक्रार करू शकता . ३) आपण acbMaharashtra  या वेबसाईटवर ऑनलाइन तक्रारही नोंदवू शकता . याकरिता chrome ब्राउजरमध्ये acbMaharashtra हे शब्द टाइप केले कि आपणास acbMaharashtra ची वेबसाईट सुरुवातीलाच दिसेल ३) य...

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन विशेष १७ सप्टेंबर

    आदरणीय गुरुजन व सुजाण श्रोतेहो नमस्कार . आज १७ सप्टेंबर मराठवाड्याचा मुक्तिदिन . आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य झाला पण मराठवाडा मात्र पारतंत्र्यातच होता . निजामशहाच्या अत्याचाराने त्रासला होता . स्वतंत्र भारत देशामध्ये असे छोटे छोटे तुकडे असणे देशाच्या सावभौमत्वासाठी धोकादायक होते . तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी निजामशहाला सवतंत्र भारतामध्ये विलीन होण्याचे आवाहन केले . निजामशाहाने या आवाहनाला केराची टोपली दाखवली .        मवाळ नेहरूंपुढे न झुकणाऱ्या निजामशाहासाठी तत्कालीन गृहमंत्री , लोहपुरुष सरदार वल्लभभाई पाटील यांनी पुढाकार घेतला . विनंती न करता पोलिस कारवाई केली . निजामशाहीमध्ये सैन्य घुसवलं व निजामशहास गुडघे टेकण्यास भाग पाडले . ही घटना घडली तो दिवस म्हणजे १७ सप्टेंबर १९४८ . म्हणूनच हा दिवस संपुर्ण मराठवाड्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो .      या स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रखर लढा दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना विनम्र अभिवादन करतो व मी थांबतो . जय हिंद , जय महाराष्ट्र , जय मराठवाड...